• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे येथील आदर्श पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

ByEditor

Feb 23, 2024

स्वमालकीच्या जागेत माजी राजिप सदस्य नरेंद्रशेठ जैन यांच्या हस्ते झाले उद्घाटन

किरण लाड
नागोठणे :
रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य असणाऱ्या आदर्श पतसंस्थेचा नागोठणे शाखेचा स्वमालकीच्या जागेतील उद्घाटन सोहळा कोएसोचे नागोठणे येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलाचे चेअरमन, माजी राजिप सदस्य नरेंद्रशेठ जैन यांच्या हस्ते पार पडला.

आदर्श पतसंस्थेचे मुख्य कार्यालय अलिबाग येथे असून त्यांच्या रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी शाखा आहेत. आदर्श पतसंस्थेची नागोठणे शहरात काही वर्षापूर्वी शाखा सुरु झाली होती. परंतू स्वमालकीच्या जागेत नसल्याने ती अडचण त्यांना भासत होती. अल्पावधीत आपल्या व्यवहाराने जनमानसात लोकप्रिय झालेल्या नागोठणे येथील आदर्श पतसंस्थेने ती अडचण काही दिवसातच दूर केली.

ग्राहकांना, खातेदारांना चांगली सेवा देता यावी यासाठी नागोठणे शाखेचा अद्यावत, स्वमालकीच्या जागेत स्थलांतर सोहळा 22 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नरेंद्रशेठ जैन यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच सुप्रिया महाडीक, पतसंस्थेचे संस्थापक सुरेश‌ पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील, उपाध्यक्ष कैलाश जगे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनाक्षी पाटील, रोहा तालुका दक्षता कमिटीचे माजी अध्यक्ष भाई टके, सामाजिक कार्यकर्ते वसंत तेरडे उपस्थित होते. पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्यास नागोठणे शहरातील प्रतिष्ठीत मान्यवर, आदर्श पतसंस्थेचे सभासद, ग्राहक, पतसंस्थेचे व्यवस्थापक, कर्मचारी उपस्थित होते. आदर्श पतसंस्थेनी या आनंदी सोहळ्याप्रसंगी शहरातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सौभाग्याचं लेणं घेण्यासाठी महिलांनी पतसंस्थेच्या नवीन कार्यालयात मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दाखविली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!