अमुलकुमार जैन
अलिबाग : येथील कुंटे बाग येथील जिल्हा परिषदेमधील बांधकाम विभागात कार्यरत असणारे कांबळे नामक अभियंता यास लाच घेताना नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यालयात कार्यरत असणारा अभियंता कांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या कामाच्या फाईलचे काम रखडले होते. सदर काम हे त्वरित व्हावे यासाठी लाचखोर कांबळे याने सदर तक्रारदार यांच्याकडे काही रक्कमेची लाच मागितली असता सदर महिलेने तडजोड करीत काही रक्कम देण्याचे कबूल करीत नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. फिर्यादी यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत विभागाचे उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी बांधकाम विभागात कारवाई करीत त्याला ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.