अंतोरा येशील हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विनायक पाटील
पेण : “हिंदू संस्कृतीत महिलांच्या मानसन्मान केला जातो. संपत्तीची देवी लक्ष्मी, शक्तीची देवी दुर्गा व विद्येची देवी सरस्वती आहे. स्त्री मध्ये संपत्ती, शक्ती व विद्या यांचे प्रतीक आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक व इतर क्षेत्रात स्त्रीने आपला ठसा उमटवलेला आहे. आपला संसार सांभाळून ती प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. आदर्श मुलगी, आदर्श पत्नी, आदर्श सून असा प्रवास करताना समाजात आपला ठसा उटवलेला आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये आदिशक्ती देवीचा वास असून त्यामुळे ताकतीने ते प्रवास करीत असते. या प्रवासात प्रत्येक स्त्रीने एकमेकींना मदत करणे, मानसन्मान देणे गरजेचे आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार “बेटी बचाव, बेटी पढाव”, ‘उज्वला योजना’, ‘लेक लाडकी’ अशा अनेक योजनांच्या माध्यमातून महिला सबलीकरण करीत आहे. या योजनांचा लाभ प्रत्येकीने घेतला पाहिजे.” असे वक्तव्य शर्मिला वैकुंठ पाटील यांनी अंतरा येथील हळदीकुंकू समारंभ बोलताना केले.

पेण पाली सुधागड मतदार संघाचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील,भाजप जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या प्रयत्नाने भारतीय जनता पार्टी पेण तालुका महिला यांच्या वतीने अंतोरा येथे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जि प सदस्या कौशल्या पाटील, भाजप रायगड उपाध्यक्षा महिला मोर्चा शर्मिला पाटील, तन्वी पाटील, स्नेहल सावंत, वंदना म्हात्रे, मेघाताई राजेंद्र पाटील, मानसी नरेंद्र पाटील, कार्तिकी पाटील आदींसह पदाधिकारी तसेच परिसरातील महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी भारतीय जनता पार्टी पेण तालुका महिला आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिलांना वाण देण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टी राबवत असलेल्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याणी कोळी, कार्तिकी पाटील, कांचन म्हात्रे, मनीषा म्हात्रे, रेश्मा थळे, प्रगती पाटील, प्रियंका पाटील व इतर महिलांनी नियोजन केले.