• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावजवळ दुचाकीची रिक्षाला धडक; दोघे जखमी

ByEditor

Feb 24, 2024

सलीम शेख
माणगाव :
शहारापासून ८ किमी अंतरावर असणाऱ्या कशेणे गावच्या हद्दीत शंकर मंदिराजवळ मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव येणाऱ्या दुचाकीची रिक्षाला धडक लागून २ जण जखमी झाले. सदरील अपघात शुक्रवार, दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद जयवंत सुरेश हिलम (वय- ३२) रा. निलज आदिवासीवाडी, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील आरोपी मारुती भिवा हिलम (वय-३०) रा. हर्णे आदिवासीवाडी, ता. माणगाव याने त्याच्या ताब्यातील यामाहा एफ झेड मोटारसायकल क्र. एमएच.०६ एव्ही १७७१ हि गाडी मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे घेऊन जात असताना अपघाताच्या ठिकाणी आल्यावर त्याने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल हि अतिवेगाने चालवून समोरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ओव्हरटेक करीत असताना विरुद्ध दिशेला येऊन फिर्यादी जयवंत सुरेश हिलम यांच्या ताब्यातील रिक्षा क्र. एमएच ०६ बीव्ही ०९९६ या गाडीला समोरून धडक देऊन अपघात घडला. या अपघातात जयवंत सुरेश हिलम (वय- ३२) रा. निलज आदिवासीवाडी ता. माणगाव व मारुती भिवा हिलम (वय-३०) रा. हर्णे आदिवासीवाडी, ता. माणगाव हे दोघे जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं. ३८/२०२४ भादंवि कलम २७९ ,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दोडकुलकर हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!