सलीम शेख
माणगाव : माणगाव-निजामपूर रस्त्यावर २ किमी अंतरावर असणाऱ्या खर्डी गावच्या हद्दीत गारवा हॉटेलजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या होंडा शाईन दुचाकीची समोरून येणाऱ्या होंडा स्टनर दुचाकीला धडक लागून २ जण जखमी झाले. सदरील अपघात शुक्रवार, दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद मोहन शिवा राठोड (वय- ३०) रा. दत्तनगर, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील आरोपी दीपक नथुराम तेलंगे (वय-४३ ) रा. शिरसाड, ता. माणगाव याने त्याच्या ताब्यातील होंडा शाईन मोटारसायकल क्र. एमएच ०६ बीआर ६८१५ हि गाडी अपघाताच्या ठिकाणी आल्यावर त्याने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल हि अतिवेगाने चालवून विरुद्ध दिशेला आणून समोरून येणाऱ्या होंडा स्टनर मोटारसायकल क्र. एमएच ०६ बीसी ७३३२ या गाडीवरील चालक रोहिदास नथुराम पवार ( वय-५५) रा. दत्तनगर, माणगाव व त्यांच्या पाठीमागे बसलेला मल्हारी छानदार मोहिते (वय-८१) रा. नीलगून, तालुका माणगाव यांच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात रोहिदास नथुराम पवार ( वय-५५) रा. दत्तनगर, माणगाव व त्यांच्या पाठीमागे बसलेला मल्हारी छानदार मोहिते (वय-८१) रा. नीलगून, तालुका माणगाव हे दोघे जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं. ३६ /२०२४ भादंवि कलम ३०४(अ) ,२७९ ,३३७,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.