• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

निजामपूर विभाग राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला!

ByEditor

Feb 24, 2024

विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनात आ. अनिकेत तटकरेंचे गौरोवोद्गार

सलीम शेख
माणगाव :
निजामपूर विभागातून तीन वेळा मोठ्या मताधिक्यांनी खा. सुनील तटकरे यांना निवडून दिले. त्यामुळे तटकरे साहेबांचा हा विभाग लाडका म्हणून ओळखला जातो. तटकरे साहेब मंत्री असताना व आता खासदार असताना या भागात अनेक विकास कामे केली आहेत. विळे–भागाड एमआयडीसी आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात या भागात रोजगार निर्मिती होईल व त्यातून विकासाच्या अनेक वाटा खुल्या होतील. यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. औद्योगिकीकरणा बरोबरच ग्रामीण भागात दळणवळणामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल व त्यातूनच नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल यावर भर दिला. या भागाला विकासात नेहमीच झुकते माप दिले. त्यामुळे हा विभाग नेहमीच खा. तटकरे यांच्या पाठीशी आजही ठाम राहिला. त्यामुळे निजामपूर विभाग हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे आ. अनिकेत तटकरे यांनी या विभागातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनात अधोरेखित करीत गौरोवोद्गार काढले.

निजामपूर विभागातील विविध विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन निजामपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजित केला होता. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते महाड, माणगाव, पोलादपूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस बाबूशेठ खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली ता. २३ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता पार पडला. त्यावेळी निजामपूर विभागीय अध्यक्ष संदीप जाधव, माजी उपसभापती तुकाराम सुतार, युवक उपाध्यक्ष शिवा घाग, सचिव किरण पागार, निजामपूर राष्ट्रवादी महिला कॉ. अध्यक्षा देविका पाबेकर, विळे विभाग युवक उपाध्यक्ष निलेश वांजळे, निजामपूर गण अध्यक्ष घनश्याम तटकरे, शाम तवटे, सौरभ तटकरे, दिगंबर खुंटेकर, भाले सरपंच दत्ता खांबे, सागर खानविलकर, नरेश कदम, हरीश्चंद्र भेसळ, एकनाथ मानकर, अंकुश मोरे, भाऊ होगाडे, दिलीप पवार, ललित साखळे, शिरवली ग्रा. पं. सदानंद पानसरे, संदीप माने, आप्पा खानविलकर, निलेश काते, प्रकाश शेपुंडे, विठ्ठल सावंत यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जावटे येथे अंगणवाडी इमारतीचे आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर भाले येथे अंतर्गत रस्ता भूमिपूजन तसेच शंकर मंदिराकडे जाणारा रस्ता भूमिपूजन, कसबेवाडी येथे सामाजिक सभागृह भूमिपूजन, बोंडशेत येथे अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन, साखरेवाडी येथे अंतर्गत रस्ता भूमिपूजन, कुर्डूपेठे येथे रस्ता भूमिपूजन, बोरमाच रस्ता भूमिपूजन, जिता अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन, शिरवली अंतर्गत रस्ता भूमिपूजन, तसेच भागाड एमआयडीसी येथे ओम शिव चालक मालक संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे संयुक्त विद्यमाने कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ. अनिकेत तटकरे यांनी सांगितले की, या भागातील औद्योगिकरण व पर्यटनातून मोठ्या प्रमणात रोजगार निर्मिती झाली आहे. तुम्ही सुचवलेली कामे आम्ही केली आहेत. उर्वरित कामेही लवकरच करू असा विश्वास देत अगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांनी ताकतीने कामाला लागा. पुन्हा खा. तटकरे यांचे हात बळकट करीत तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे असे सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!