सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर
नागोठणे : येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सह संपर्कप्रमुख किशोरशेठ जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या वेळी शिवसेना उप शाखाप्रमुख मुकेश भोय यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी संजय पिंपळे व संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून संजय महाडिक, कीर्तिकुमार कळस, बाळू रटाटे, ज्ञानेश्वर साळुंखे, प्रकाश कांबळे, इम्रान पानसरे, समीर भिकन यांची तर सचिव पदी पंकज कामथे, खजिनदार अनिल महाडिक, सह सचिव अल्विन नाकते, सह खजिनदार नागेश सुर्वे, सदस्य पदी राजेश सुर्वे, हितेश भोय, अजित दळवी, शेखर जोगत, रुपेश नागोठणेकर, दत्ता कडव, संतोष घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी किल्ले रायगडावरून शिवज्योत आणण्याचा मान नागोठणे गवळ आळी ग्रामस्थांना मिळाला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सल्लागार डॉ. मिलिंद धात्रक, सुरेश जैन, मोहन नागोठणेकर, मजीद लंबाते यांच्यासह सर्वांनी अभिनंदन केले आहे.