• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

धक्कादायक! अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीवर गुन्हा दाखल

ByEditor

Mar 5, 2024

मिलिंद माने
महाड :
माणुसकीला काळिमा फासणारी घटना ०३/०३/२४ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील चोचिंदे गावात घडली असून एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनायक गुरव, रा. चोचिंदे यांनी रविवारी ३/३/२०२४ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन मतिमंद मुलीला पैशाचे अमिष दाखवून आपल्या राहत्या घरामध्ये बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी मुलीच्या आजीने महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महाड शहर पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय दंड विधान कलम ३७६(४)(३), ३७६(२)(एन),३७६(२)(एल),३७६(ऐ बी)३५४, बालकांचे अपराधा पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८,१०,१२ सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ ३(१)(डब्ल्यू) (एक)(दोन),३(२)(व्ही),३(२)(व्हीऐ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी काळे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!