सलीम शेख
माणगाव : येथील दत्तनगरमधील घटनेत मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी दोघा आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल काण्यात आला आहे. सदरची घटना शनिवार, दि. १६ मार्च २०२४ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची फिर्याद सागर काशिनाथ दाते (वय- २९) रा. डोंबिवली, पूर्व मुंबई यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील आरोपी राज वर्मा (पूर्ण नाव गाव माहित नाही) याला नाचताना डीजेवाल्या मुलाचा धक्का लागला. या गोष्टीचा आरोपी राज वर्मा व राहुल (पूर्ण नाव गाव माहित नाही) याना राग येऊन ते डीजेवाल्या मुलास मारहाण करीत असताना फिर्यादी सागर काशिनाथ दाते हे सोडविण्यासाठी गेले असता दोन्ही आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना हाताबुक्यांनी मारहाण करून तसेच शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देऊन आरोपी राज वर्मा याने कोणत्यातरी टोकदार वस्तूने फिर्यादी यांच्या डाव्या डोळ्याजवळ मारून दुखापत केली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. रजि. नं. ७३/२०२४ भादवी कलाम ३२४,३२३,५०४,५०६,३४ अन्वये करण्यात येऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सानप करीत आहेत.
