घन:श्याम कडू
उरण : तालुक्यातील चिरले गावातील एका 35 वर्षीय व्यक्तीने अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीस उरण पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अधिक तपास उरण पोलीस करीत आहेत. उरणमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
लैंगिक अत्याचारात जखमी झालेल्या चिमुकलीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेतील आरोपी हा मुलीच्या शेजारी रहाणारा आहे. घटनेनंतर मुलगी गप्प एका कोपऱ्यात रहात होती. आईने तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने घाबरून काहीच सांगितले नाही. मुलीच्या आईने वेळीच दखल घेत डॉक्टरकडे तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आले.
गुरुवारी १४ मार्च रोजी चिरले येथे राहत्या घरी मुलीवर बलात्कार केला असल्याचे समोर आले आहे. पीडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलम आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो कायदा) अंतर्गत एफआयआर नोंदवला आणि त्याला अटक केली असल्याची माहिती पोलिसांना दिली.
उरणमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत चालली असून पालक वर्ग चिंतेत सापडला आहे. यातील काही घटनांचे गुन्हे दाखल होतात तर काहींचे दाखल होत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
