• Tue. Jul 1st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडमध्ये धैर्यशील पाटील यांनी विजय शिवतारेंप्रमाणे भूमिका घ्यावी -स्वप्नील म्हात्रे

ByEditor

Mar 20, 2024

विनायक पाटील
पेण :
देशात नुकतेच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. टप्प्याटप्प्याने होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय उलथापालथींमुळे उमेदवारांचे वेगवेगळ्या टप्प्यांवर तिकीट दिले व कापले जात आहे. अशातच 32 रायगड लोकसभेमध्ये सुद्धा अनेक पेच निर्माण होताना दिसत आहेत. सन 2023 मध्ये पेण विधानसभेचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना भावी लोकसभा उमेदवार म्हणून भाजपाने पक्षप्रवेश करून घेतला आणि त्यांना दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारीही दिली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात एक नवीन उमेद तयार झाली. सर्व कार्यकर्ते व भाजपा परिवारातील समविचारसरणीची लोकं पायाला भिंगरी बांधवी तशी उत्साहात पक्ष वाढीच्या कामाला लागली. गेल्या 10 वर्षात पक्ष वाढीसाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेषतः महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पेणचे आमदार रवीशेठ पाटील व लोकसभा अध्यक्ष सतीश धारप यांनी अपार मेहनत घेतली. तर धैर्यशीलदादा पाटील यांनी दक्षिण रायगड मजबुतीने बांधून घेतला व रायगड लोकसभा लढविण्यासाठी सज्ज झाले. भाजपचा खासदार हमखास निवडून येईल इतकी ताकद निर्माण केली.

धैर्यशील पाटील यांनी भाजपाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, वेगवेगळ्या पक्षातील आजी, माजी आमदार, अनेक विविध स्तरातील सामाजिक संघटना, विविध पक्षांच्या नेत्यांची एक वज्रमूठ बांधली. बहुतांश कुणबी मराठा व इतर समाज एकत्र केला. आज 32 रायगड लोकसभेमध्ये भाजपाचे स्वतःचे किमान 3 लाखांहून अधिक मताधिक्य आहे. मित्र पक्षांचे अजून वेगळे मताधिक्य आहे. 1952 नंतर पहिल्यांदा रायगडमध्ये भाजपचा खासदार निवडून येणार हे पक्के झाले परंतु, महाराष्ट्राचे राजकीय समीकरण बदलले आणि भाजप-सेना युतीमध्ये राष्ट्रवादीची एंट्री झाली. आता परत लोकसभा समीकरण बदलत आहे. असं जरी असलं तरी रायगडच्या जनतेची वेगळीच भावना आहे. रायगडची जनता भावी खासदार म्हणून धैर्यशील पाटील यांनाच पहिली पसंती देत आहे. लोकं ज्याप्रमाणे बारामती मध्ये दोन्ही पवारांना कंटाळली आहेत तशीच रायगड मध्ये आता गिते व तटकरेना कंटाळली आहेत. रायगडचा होणारा खासदार हा सर्व समावेशक असावा, सर्व घटकांना सामावून घेणारा असावा असं जनतेचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातील विविध एक्सिट पोलचे निष्कर्ष सुद्धा धैर्यशील पाटील यांच्याच बाजूने आहे. परंतु मी जेष्ठ व श्रेष्ठ आहे म्हणून मलाच तिकीट मिळावं म्हणून काही लोक बोलताना दिसत आहेत. परंतु बड्या नेत्याला पराभव समोर दिसत असताना देखील बाळहट्ट करावासा वाटतो हे विशेष.असे स्वप्निल म्हात्रे यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी साहेबांनी स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त भारताची संकल्पना मांडली व आपले नवीन सहकारी देखील त्याच पात्रतेला खरे उतरावे म्हणून प्रयत्न देखील केला. म्हणून भाजपचे कार्यकर्ते कुठल्याही भ्रष्टाचारी उमेदवारास पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत नाहीत.आज रायगड लोकसभेसाठी त्या योग्यतेचा व स्वच्छ चरित्र्याचा, 10 वर्ष आमदार असताना भ्रष्टाचारचा एकही डाग नसलेला निष्कलंक नेता, हमखास विजयी होणारा उमेदवार म्हणून माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्याकडे बघितलं जात आहे. परंतु, त्यांना पक्ष जर दुटप्पी वागणूक देत असेल आणि भाजपा भविष्यात कमकुवत करण्याचा प्रयत्न जर होणार असेल तर मात्र धैर्यशील पाटील यांनी बारामती प्रमाणे विजय शिवतारेंसारखी ठाम भूमिका घ्यावी. महाराष्ट्राच्या नेतृत्वाला तसं सांगावं व अधिकृत तिसरा पर्याय म्हणून लोकसभेला उभं राहावं असं माझ्यासारख्या भाजपच्या लहान कार्यकर्त्याला वाटतंय. भाजपच्या संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत भाजपच्या नेत्यांनी अशी वाया जाऊ देऊ नये अशी विनंती सगळ्याच कार्यकर्त्यांकडून होत आहे. धैर्यशीलदादांनी रायगड लोकसभेसाठी शिवतारेंप्रमाणे ठाम भूमिका घ्यावी अशी मी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या वतीने विनंती करीत आहे असे ही स्वप्निल म्हात्रे यांनी सांगितले.

मोदीजींनी अबकी बार 400 पार चा नारा दिला, परंतु कोणाचं तरी समाधान व्हावं म्हणून पराभूत होणाऱ्यांना पण खिरापतीसारखी तिकिटं वाटत गेले तर 400 पार कसं होणार असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात रोज उभा राहत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!