गुजरात, मध्यप्रदेशातील व्यावसायिक विक्रीसाठी दाखल
घन:श्याम कडू
उरण : उन्हाच्या झळा वाढू लागल्याने माठांना मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातील ठराविक गावांमध्ये माठ बनवत असले तरी बाजारात ऐनवेळी उपलब्ध होणाऱ्या गुजरात, मध्यप्रदेश या भागातील माठ, लाल, काळ्या रंगाचे माठ, नळ लावलेले माठ बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. याशिवाय नक्षीदार, रंगीबेरंगी माठही शहरात विक्रीकरिता दाखल झाले आहेत.
सध्या उन्हाची दाहकता वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून माठाच्या आकारानुसार १०० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत माठ विक्रीस आहेत. लाल माती व काळ्या मातीपासून बनवण्यात आलेले माठ थंड पाण्यासाठी स्वस्त पर्याय मानले जातात. उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी गार पाण्याची आवश्यकता असते. यातच गारवा नैसर्गिक आणि मातीचा गोडवा देणारा असेल तर त्याला अधिकच महत्व आहे. म्हणूनच गरिबाचा फ्रिज अर्थात मातीच्या माठांना आजही महत्व टिकून आहे. उन्हाच्या तीव्रतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने गरिबाचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रंगीबिरंगी नक्षीदार माठ्यांबरोबर लाल आणि काळ्यामाठाना यंदा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. माठ थंड पाण्यासाठी स्वस्त पर्याय मानले जातात.
माठातील पाण्याची चवच न्यारी उन्हाची तीव्रता वाढताच माठातील पाण्याची उन्हाळ्यात आवश्यकता असते. फ्रीजमधील पाणी घेतल्यानंतर पुन्हा पुन्हा पाणी प्यावे, असे वाटते. परंतु, माठातील पाणी एकदा पिल्यानंतर सर्वोत्तम मानले जाते व तहान पूर्ण होते. मातीत विविध गुणधर्म असतात म्हणून माठातील पाण्याची चव न्यारीच असते. |