• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

हेटवणे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गुरे चोरण्याचा बेत फसला

ByEditor

Mar 30, 2024

विश्वास निकम
गोवे-कोलाड :
दिवसेंदिवस गुरे चोरण्याचे प्रकार वाढत असून रस्त्याच्या बाजूला चरण्यासाठी उभी असणारी उनाड गुरे बघून या गुरांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करुन ती गाडीमध्ये भरून चोरी करण्याच्या घटना घडत आहेत. परंतु, हेटवणे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गुरे चोरी करण्याचा प्रयत्न फसला आहे.

शुक्रवार, दि. २९ मार्च २०२४ रोजी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास राजेश निकम यांनी गाडीतुन दोन माणसे उतरून गुरांना चारा घालून इंजेक्शन देऊन गाडी निघून गेली असल्याचे पहिले. त्यांनी ताबडतोब गजानन मोरे, संतोष निकम, कैलास निकम, विलास निकम, मुकुंद पाटेकर यांना फोन केला व झालेला प्रकार सांगितला. अर्ध्या तासाने बेशुद्ध केलेली गुरे नेण्यासाठी गाडी आली पुन्हा आली. गुरे गाडीत भरण्याची सुरुवात करीत असताना ग्रामस्थ धावून गेले असता हे गुरे चोरी करणारे गाडी सुरु करून पळून गेले. ग्रामस्थांनी गाडीच्या दिशेने दगडफेक केली परंतु, चोर गाडीतून पसार झाले. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गुरे चोरण्याचा चोरांचा बेत मात्र फसला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!