• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ग्रुप ग्रामपंचायत जासईतर्फे थकीत कर संदर्भात जप्तीची कारवाई

ByEditor

Mar 31, 2024

विठ्ठल ममताबादे
उरण :
ग्रुप ग्रामपंचायत जासई हद्दीतील यार्ड धारकांची कर वसुली कामे जप्ती प्रक्रिया करण्यात आली. यावेळी आर. के. लॉजिस्टिकस यार्डला टाळे ठोकून जप्ती करण्यात आली. जप्तीची कारवाई करताच क्षणी आर. के. लॉजिस्टिक व्यवस्थापनाने ५ लाख रुपयाचा कर ग्रामपंचायतला भरला व उर्वरित कर काही दिवसात ग्रामपंचायतला भरणार असे सांगितले.

यावेळी ग्रुप ग्रामपंचायत जासईचे सरपंच संतोषशेठ घरत, ग्रुप ग्रामपंचायत जासई उपसरपंच माईताई पाटील, ग्रामविकास अधिकारी भास्कर पालकर, ग्रुप ग्रामपंचायत जासईचे सदस्य आदित्य घरत, सुदर्शन पाटील, रामकिशोर ठाकूर, विनायक पाटील, आनंद म्हात्रे, वीणा घरत, सुलोचना घरत, आश्विनी नाईक, हर्षदा तांडेल, श्रुष्टी म्हात्रे, जयश्री घरत, प्रतिक्ष म्हात्रे व नागरिक उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!