• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणार्‍या तरुणाला अटक

ByEditor

Apr 2, 2024

घनःश्याम कडू
उरण :
उरण भागात राहणार्‍या 21 वर्षीय तरुणाने त्याच भागात राहणार्‍या एका 15 वर्षीय मुलीशी मंदिरात विवाह केला. त्यानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याचे उघड झाले आहे.

पीडित मुलीने रुग्णालयात मुलीला जन्म दिल्यानंतर डॉक्टरांनी याबाबतची माहिती उरण पोलिसांना दिली. त्यानंतर उरण पोलिसांनी पीडित मुलीशी विवाह करणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेतील 15 वर्षीय पीडित मुलगी व तिच्याशी विवाह करणारा 21 वर्षीय तरुण हे दोघेही उरण परिसरात एकाच भागात राहण्यास आहेत. वर्षभरापूर्वी या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, दोघांचेही वय कमी असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांच्यातील प्रेमसंबंधाला विरोध केला होता. मात्र, त्यानंतरदेखील त्या दोघांनी आपल्या कुटुंबियांचा विरोध डावलून मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. तिला प्रसववेदना होत असल्यामुळे ती चार दिवसांपूर्वी रुग्णालयात गेली होती. या वेळी पीडित मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी उरण पोलिसांना याबाबतची माहिती दिली. उरण पोलिसांनी तरुणावर बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने तरुणाला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!