• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आदर्श पतसंस्थेची नावाप्रमाणे कामगिरी; एक टक्क्यापेक्षा कमी नाममात्र एनपीए (NPA)

ByEditor

Apr 2, 2024

प्रतिनिधी
अलिबाग :
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन 2023- 2024 या आर्थिक वर्षात ढोबळ एनपीएमध्ये 0.37 टक्क्यांनी घट झाली आहे. ढोबळ एनपीए 0.56 टक्के इतका आहे. हे एनपीए प्रमाण नाममात्र आहे. निव्वळ नफा रु. 6 कोटी 10 लाख रूपये झाला आहे. आदर्शच्या एकत्रीत व्यवसायात रु. 110 कोटी 50 लाख रूपयांनी वाढ झाली आहे. आर्थिक सक्षम , ढोबळ एन.पी.ए नाममात्र, उत्तम लाभता क्षमता असलेली नावा प्रमाणे आदर्श पतसंस्था आपल्या नावाप्रमाणे आदर्श काम करत आहे, अशी माहिती आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील व अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली.

सन 2022 – 2023 आर्थिक वर्षात आदर्श नागरी पतसंस्थेचा ढोबळ एनपीए (NPA) 0.92 टक्के होता. त्यात सन 2023 – 2024 या आर्थिक वर्षात 0. 37 टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा एनपीए प्रमाण 0.56 टक्के आहे. तसेच निव्वळ एनपीए प्रमाण शून्य टक्के आहे. आदर्श पतसंस्थेने सलग १६ वर्षे निव्वळ एनपीए प्रमाण शून्य टक्के राखले आहे, अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिली. सन 2023 – 2024 या आर्थिक वर्षात संस्थेला ढोबळ नफा रु. 08 कोटी 05 लाख रुपये झाला आहे व निव्वळ नफा रु. 06 कोटी 10 लाख रुपये झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निव्वळ नफ्यात रु. 1 कोटी 29 लाख रूपये वाढ झाली आहे. तसेच संस्थेने रु. 133 कोटी 66 लाख रुपयांची गुंतवणूक केली आली आहे.

आदर्श पतसंस्थेने रु. 618 कोटी 57 लाख रुपयांचा एकत्रित व्यवसाय केला आहे. सन 2022 – 2023 या आर्थिक वर्षापेक्षा रु. 110 कोटी 50 लाख रूपयांनी एकत्रित व्यवसाय वाढला आहे. मागील वर्षी रु. 508 कोटी 08 लाख रूपयांचा एकत्रीत व्यवसाय होता. आदर्शचे वसूल भागभांडवल रु. 16 कोटी 74 लाख रूपये आहे. आदर्श नागरी पतसंस्थेच्या ठेवी रु. 358 कोटी 05 लाख रूपये आहेत गेल्या वर्षी संस्थेच्या रु. 302 कोटी 92 लाख रूपये ठेवी होत्या. त्यात यावर्षी रु. 55 कोटी 14 लाख रूपयांनी वाढ झाली आहे. सन 2022 – 2023 मध्ये संस्थेचे रु. 205 कोटी 16 लाख रूपये कर्ज वाटप होते.सन 2023 – 2024 मध्ये संस्थेचे रु. 260 कोटी 52 लाख रूपये कर्ज वाटप झाले आहे. मुदतपूर्ण थकबाकी ७ कर्जदारांकडे आहे. त्याचे प्रमाण 0.01 टक्के आहे, अशी माहिती अभिजीत पाटील यांनी दिली.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यक्षेत्र रायगड, मुंबई , ठाणे, पुणे , रत्नागिरी , सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यामध्ये आहे. अलिबाग, नागाव, चेंढरे, चोंढी, पिंपळभाट, कुरुळ, बामणगाव, रेवदंडा, श्रीबाग, मुरूड, पोयनाड, रेवस, नागोठणे, रामराज, पेण, उरण, काशिद, मुख्यालय अशा एकूण 17 शाखा आहेत. या सर्व शाखांमधील कर्मचार्‍यांनी प्रामणिकपणे काम केले. चांगली वसूली केली त्यामुळे एनपीए १ टक्क्यापेक्षा कमी राखता आला, असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

आदर्शचे संचालक मंडळातील सहकारी संचालक , सभासद, ठेवीदार, ग्राहक ,हितचिंतक आर्थिक सल्लागार , कर्मचारी ,पिग्मी प्रतिनिधी , कायदेविषयक सल्लागार यांच्यामुळेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो , असे आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील व अध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!