सन २०२३- २०२४ या आर्थिक वर्षात ९१ टक्के कर वसुली
विनायक पाटील
पेण : पेण नगरपरिषदेची सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात ११ कोटी ९४ लक्ष मालमत्ता कराची मागणी होती. सदर मागणीपैकी १० कोटी ९१ लक्ष (९१%) मालमत्ता कराची वसुली झाली आहे. ही मालमत्ता कराची विक्रमी वसुली असल्याचे वसुली विभाग प्रमुख महेश वडके यांनी सांगितले.
पेण नगरपरिषदेत सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात महायुएलबी हि नविन संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. सदर संगणक प्रणालीचा वेग अत्यंत संथ होता. तसेच तांत्रिक अडचणी येत होत्या.संथ गतिने चालणारी संगणक प्रणाली, अपुरा कर्मचारी वर्ग, निवडणुक कामे, इत्यादी अडचणी असताना देखील मुख्याधिकारी जीवन पाटील यांचे आदेशाने व किरण शहा (लेखापाल व लेखापरिक्षक) यांचे मार्गदर्शनाखाली गोविंद भिसे (कर निरिक्षक), महेश वडके (वसुली विभाग प्रमुख), निकिता पाटिल संगणक अभियंता, विश्वनाथ गायकवाड (गटप्रमुख), संजय पाटील (गटप्रमुख), महेंद्र गाडेकर (गटप्रमुख), मधुकर ठाकुर (गटप्रमुख), संदीप पाटील, प्रविण बैकर, विलास लिमये, दिपक हजारे, विवेक सावंत, शिवानी नाक्ते, दर्शना ठाकुर, जोत्स्ना पाटील, सुरेखा गुरव, पायल पाटील, यश बांदिवडेकर, ओंकार लोखंडे या कर व वसुली विभागातील कर्मचाऱ्यांनी वसुलीची मोहिम पार पाडली.
ही यशस्वी व मालमत्ता कराची विक्रमी वसुली केल्याबद्दल पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.