• Sat. Jun 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोलाड येथे कारला भीषण अपघात, दोन जण जागीच ठार, एक गंभीर जखमी

ByEditor

Apr 3, 2024

अमोल पेणकर
रोहे :
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील कोकण रेल्वे पुलाखाली खांब बाजुकडून रोहे येथे जाण्यासाठी मुंबई-गोवा महार्गावरून कोलाड येथील कोकण रेल्वे पुलाखालून उजव्या बाजूला द. ग. तटकरे हायस्कूलकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडताना सेलोरीयो कार क्र. एमएच ४७ डब्लू १७६५ या गाडीला गोवा बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या ट्रेलर क्र. एमएच ४३ बीएक्स ९५१९ यावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थिती दुर्लक्ष करुन सेलोरीयो गाडीला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक पोहवा हनुमंत मुडे यांनी दिलेल्या माहिती नुसार रात्री ११.१० वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड कोकण रेल्वे पुलाखालून कोलाड हायस्कूलकडे रस्ता ओलांडून जाणाऱ्या सेलोरीयो कारला गोवा बाजुकडून भरधाव येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात योगेश सुधाकर गुरव (रा. वैभव नगर वरसे, ता. रोहा) व परेश नामदेव खांडेकर (रा. राम मंदिर जवळ, मराठा आळी, अष्टमी रोहे) यांचा जागीच मृत्यू झाला असुन योगेश मनोहर पाटील (रा. वरसे) हा गंभीर जखमी झाला आहे. यावेळी ट्रेलर चालक शेरसिंग ओमप्रकाश यादव (रा. चरणदिप घाट मलकापूर, संभल उत्तर प्रदेश) याला कोलाड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गु.र.नं ३०/२०२४ भादवी कलम ३०४ (अ )२७९,३३७,३३८,मो. वा का प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी रोहा शैलेश काळे, कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि एन. एम. मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई एन. एल. चौधरी, पोहवा एन. वाय. गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!