मिलिंद माने
मुंबई : सन 2024 ची लोकसभा निवडणूक पार पडत आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात पाच जागा, दुसऱ्या टप्प्यात आठ जागा, तिसऱ्या टप्प्यात 11, चौथ्या टप्प्यात 11 व पाचव्या टप्प्यात 13 जागांवर निवडणुका होत आहेत. यात भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे तर राहुल गांधी व मित्रपक्ष इंडिया आघाडी देखील अस्तित्वासाठी लढत आहे. असे असताना सन 1977 ते 2019 या 42 वर्षात आत्तापर्यंतच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या याबाबतची सविस्तर आकडेवारी
सन 1977 जनता पक्ष 345 जागा, काँग्रेस १८९ जागा
सन 1980 काँग्रेस पक्ष 374 जागा, जनता पक्ष 31, लोकदल 41
सन 1984 इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस पक्ष 414 जागा, टीडीपी ३० जागा
सन 1989 राम मंदिर आंदोलनास प्रारंभ काँग्रेस पक्ष 197 जागा, भाजप 85, जनता दल 143
सन 1991 काँग्रेस पक्ष 224 ,भाजपा 120 ,जनता दल 69
सन 1996 काँग्रेस पक्ष 140 जागा, भाजपा 161, जनता दल 40
सन 1998 भाजपा 182 जागा ,काँग्रेस 141, जनता दल 6
सन 1999 भाजपा १८२ जागा, काँग्रेस 114 जागा, शिपीआय (एम) 33
सन 2004 यूपीए 218 जागा, एन .डी. ए. 181 जागा
सन 2009 यूपीए 265 जागा, एन.डी.ए 169 जागा
सन 2014 भाजपा 282 जागा, (एन.डी.ए. 336 जागा) काँग्रेस 44 जागा,( यूपीए 58 जागा)
सन 2019 एनडीए 352 जागा, यूपीए 90 जागा, एम.जी .बि 15 ,व इतर 84
15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 या काळात भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू हे काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान म्हणून शपथ घेतली
27 मे 1964 ते 9 जून 1964 या काळात गुलजारी लाल नंदा हे देशाचे पंतप्रधान होते
9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966 या काळात लालबहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान होते
11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966 गुलजारी लाल नंदा हे पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले
24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या
24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979 मोरारजी देसाई या देशाचे पंतप्रधान झाले
28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 चौधरी चरण सिंग हे देशाचे पंतप्रधान झाले
14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984 इंदिरा गांधी या पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या
31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989 राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान झाले
२ डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990 विश्वनाथ प्रताप सिंग देशाचे पंतप्रधान झाले
१० नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 चंद्रशेखर हे देशाचे पंतप्रधान झाले
21 जून 1991 ते 18 मे 1996 पी .व्ही .नरसिंहराव हे देशाचे पंतप्रधान झाले
16 मे 1996 ते एक जून 1996 अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान झाले
१ जून 1996 ते 21 एप्रिल 1997 एच . डी .देवगोडा हे देशाचे पंतप्रधान झाले
21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998 इंदर कुमार गुजराल देशाचे पंतप्रधान झाले
19 मार्च 1998 ते 19 ऑक्टोबर 1999 अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले
19 ऑक्टोबर 1999 ते 22 मे 2004 तिसऱ्यांदा अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान झाले
22 मे 2004 ते 22 मे 2009 मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले
22 मे 2009 ते 17 मे 2014 पुन्हा दुसऱ्यांदा मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले
26 मे 2014 ते 30 मे 2019 नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले
30 मे 2019 ते मार्च 2024 पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले
2024 ची लोकसभा निवडणूक होत आहे. या काळात पंतप्रधान होण्यासाठी भाजपाने 400 पेक्षा जागा निवडून येण्याचा संकल्प केला आहे तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनता दल , मायावती, आम आदमी पक्ष, यांच्यासह देशातील शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना हे सर्वच पक्ष पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान पदी विराजमान होऊ नये यासाठी या राजकीय पक्षांनी विरोधात आघाडी उघडली आहे. दुसरीकडे देशातील हिंसाचार, शेतकरी आंदोलन, विविध घोटाळे व शासकीय कंपन्या विक्रीस काढण्याचे धोरण या सर्व बाबींवर आरोप प्रत्यारोपाने ही निवडणूक गाजणार आहे.