• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिव वाहतूक सेनेच्या नागोठणे शहर अध्यक्षपदी मुकेश भोय यांची नियुक्ती

ByEditor

Apr 7, 2024

प्रतिनिधी
नागोठणे :
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष अंगिकृत शिव वाहतूक सेना, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नागोठणे शहर अध्यक्षपदी मुकेश भोय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नुकतेच माजी केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते मुकेश भोय यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना सहसंपर्क प्रमुख किशोरशेठ जैन, शिव वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश पोरे, नागोठणे संपर्कप्रमुख अनिल महाडिक उपस्थित होते. वाहतुकदारांच्या अडीअडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी तसेच कोणत्याही वाहतुकदारांवर अन्याय होऊ नये यासाठी रायगड जिल्ह्यात शिव वाहतूक सेनेचे कार्य उत्तम प्रकारे सुरू आहे. वाहतुकदारांच्या अनेक अडचणी तसेच वाहतुकीशी निगडित सामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी शिव वाहतूक सेना कार्यरत आहे. वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिव वाहतूक सेना, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष महेश पोरे व सचिव महेश केदारी यांनी माझी नागोठणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल मी संघटनेचा ऋणी आहे. तसेच माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवून पक्ष वाढीसाठी व वाहतूकीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुकेश भोय यांनी बोलताना सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!