गुन्ह्यातील सव्वादोन लाख रूपये किमतीचा मुद्देमाल मुळ मालक यांना केला परत
अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच बंद घराचे कडी कोयंडा तोडून चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून लाखोच्या दागिन्यांसह मोटरसायकल ताब्यात घेतली आहे. सदर गुन्हयातील २,२६,५००/- रूपये किमतीचा मुद्देमाल मुळ मालक यांना परत केला आहे.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीमध्ये दि. १२/१२/२०२३ रोजी सकाळी ६.४० वाजण्याचे सुमारास के. ई. एस. शाळेत आपल्या मुलांना सोडण्यासाठी आलेल्या तीन महीलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने दोन अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलवरून पाठीमागुन येवून जबरीने खेचून चोरी करून पसार झाल्याबाबत कर्जत पोलीस ठाणेस कॉ.गु.रजि.नं. २९९/२०२३ भा.दं.वि.सं.का. कलम ३९२, ३४. अन्वये दि.१२/१२/२०२३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच दि. ०१/०२/२०२४ रोजी दुपारी १२ वा ते ४.१५ वाजण्याचे दरम्यान साई गणेश अपार्टमेंट सी विंग रूम नं. १०४, मालवाडी रोड, नानामास्तर नगर, कर्जत येथे राहणारे दिलीप रामचंद्र भोईर यांचे बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडुन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण १,७५,०००/- रु. किंमतीचा मुद्येमाल दिवसा घरफोडी करून नेले बाबत अज्ञात चोरट्याविरूध्द कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं. २४/२०२४ भा.द.वि. कलम ३८०, ४५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता विभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी तयार केलेल्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रीक पुरावे व गोपनिय बातमीदाराचे मदतीने गुन्ह्यातील आरोपीत यांना अटक करून आरोपीत यांनी घरफोडी आणि गळ्यातील दागिने चोरी केलेल्या मुद्देमालापैकी २,२६,५००/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने व गुन्हा करणेसाठी वापरलेली एक हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मॉडेलची मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे. सदर दोन्ही गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आलेला एकूण २,२६,५००/- रूपये किमतीचा मुहद्येमाल न्यायालयाचे आदेशाने मुळ मालक यांचे ताब्यात देण्यात आला आहे.