प्रतिनिधी
महाड : महाड शहरातील सुकट गल्ली परिसरात विनापरवाना दारू विकणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात महाड शहर पोलिसांना यश आले आहे
महाड शहरातील सुकट गल्ली जवळील वासंती देशी दारूच्या दुकानाच्या बाजूला वेगवेगळ्या कंपनीची विनापरवाना दारू विकणाऱ्या विकास भागोजी शिंदे (वय 59, रा. चोचिंदे) याला महाड पोलिसांनी अटक केली आहे. सदरची व्यक्ती विनापरवाना वेगवेगळ्या कंपनीची दारू विकत असल्याचे महाड शहर पोलिसांना आढळून आल्यावर महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तडवी यांनी सदरच्या व्यक्तीला अटक केली असून त्याच्याकडून ९ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिनियम कलम 65 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अनधिकृतरित्या दारू विकणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक होते मात्र ज्यांनी दारूबंदीचे नियोजन करायचे ते राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी मात्र सुस्त झोपी गेले असल्याचे चित्र या निमित्ताने पाहावयास मिळत आहे.
