• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माझ्या कामाच्या पाव टक्केही काम अनंत गीतेंनी माणगांवमध्ये केले नाही -खा. सुनील तटकरे

ByEditor

Apr 17, 2024

तुम्ही मतांची अडचण भासू देऊ नका, आम्ही विकासकामांची अडचण भासू देणार नाही -आ. भरत गोगावलेमाणगावात

महायुतीची खा. सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

सलीम शेख
माणगाव :
जाणीवपूर्वक समाजासमाजामध्ये, धर्माधर्मामध्ये अंतर निर्माण केले जात आहे. निवडणूका आल्या की, विरोधी पक्षातर्फे संविधान बदलण्याची अफवा पसरवली जाते आहे. परंतु, संविधान कधीच बदलले जाणार नाही हे लक्षात घ्या पण लोकांच्या मनात संभ्रम पसरवला जातोय. राजकारणात अपरिहार्यता असते. देशाला अधिक गतिमान करायची आहे. ही महायुती झाली ती सत्तेसाठी झालेली नाही. सत्तेसाठी झाली ती ‘इंडी’ आघाडी आहे. त्यांना नेतृत्वही सांगता येत नाही, असे प्रतिपादन खा. सुनील तटकरे यांनी माणगांव येथे केले.

३२ रायगड लोकसभा महायुती उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ सभा माणगांव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महाड बँकेजवळ दि. १७ एप्रिल रोजी पार पडली. या सभेला खा. सुनील तटकरे, शिवसेना पक्ष प्रतोद आ. भरत गोगावले, शिवसेना नेते ॲड. राजीव साबळे,राष्ट्रवादीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष आनंद यादव, संपर्क प्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, प्रदेश भाजप महिला मोर्चा सचिव यशोधरा गोडबोले, प्रदेश युवती प्रवक्ता सायली दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अध्यक्ष सुभाष केकाणे, माजी सभापती संगीता बक्कम, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, भाजप नेते चिन्मय मोने, भाजप शहराध्यक्ष नितीन दसवते, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, जिल्हा युवक राष्ट्रवादी कार्याध्यक्ष शादाब गैबी, श्रीवर्धन मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अल्ताफ धनसे, रा. कॉ. शहराध्यक्षा योगिता चव्हाण, शहर अध्यक्ष नितीन वाढवळ, शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर, नगरपंचायतीच्या स्वच्छता सभापती शर्मिला सुर्वे, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष महामूद धुंद्वारे, भाजप तालुकाध्यक्ष उमेश साटम, सुमित काळे, मयूर शेट, साहिल गायकवाड, तालूका उपाध्यक्ष गणेश चव्हाण, शहर प्रमुख सुनील पवार, प्रसाद धारिया, महिला मोर्चा तालूकाध्यक्षा अश्विनी कडू, सर्व नगरसेवक, नगरसेविका, महायुती शहर पदाधिकारी, कार्यकर्ते व माणगांवकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खा. तटकरे पुढे म्हणाले की, पुढील २५ वर्षाचे व्हिजन आपल्याकडे तयार आहे. लोकांच्या सेवेसाठी पुढील २५ वर्षाचे व्हिजन आपल्याकडे तयार असले पाहिजे हे खासदाराचे काम आहे आणि ते काम मी प्रामाणिकपणे करत आहे. पुढील पाच वर्षांचा रोडमॅपही तयार आहे. माणगाव शहर वाढतंय. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गरज वाढत गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला त्यामुळेच या शहराची गरज काही प्रमाणात पूर्ण करता आली. माणगाव शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव ठेवला मात्र त्यावेळी अडचणी निर्माण झाल्या. नाहीतर त्याचवेळी रस्त्याचे रुंदीकरण झाले असते. आता आपण सर्वांनी बायपास रस्ता करायचे ठरवले आहे. आज जी वाहतूक कोंडी होतेय. तुम्ही ज्या पुलाच्या कामाचा समावेश करायला सांगितला तो येत्या अधिवेशनात केला जाईल असे आश्वासन यावेळी दिले. माणगाव येथे विभागीय क्रीडा संकुल मंजूर होऊन पहिल्या टप्प्यातील निविदा निघाली. क्रीडा क्षेत्रामध्ये या माणगावचे नाव या पाचही जिल्हयात क्रीडा संकुलामुळे माणगावचे नाव सर्वदूर पसरले जाईल. अनेकांनी मेडिकल कॉलेज व्हावे अशी मागणी केली. मात्र या माणगावात पुढच्या शैक्षणिक वर्षांत नर्सिंग कॉलेज मंजूर केले जाईल असा शब्द दिला. माझ्या एवढे काम कुणी केले नाही. माझ्या कामाच्या पाव टक्केही काम अनंत गीते यांनी या शहरात केलेले नाही.

यावेळी आ. गोगावले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा क्रांतिकारी निर्णय घेतला तेव्हा सर्वात प्रथम माणगांव नगर पंचायतने आम्हाला पाठींबा दिला. त्यामुळे माणगांवने जे जे मागितले ते ते आम्ही दिले. यापुढे ही मी व खा. तटकरे संयुक्तपणे मिळून माणगांव शहराचा विकास करू. नेहमीच माणगांवला विकासकामांच्या बाबतीत झुकते माप दिले आहे. त्यामुळे तुम्ही मतांची अडचण भासू देऊ नका, आम्ही विकासकामांची अडचण भासू देणार नाही. माणगांव शहरातून खा. तटकरेंना ४००० मताधिक्य दिलेच पाहिजे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. तुम्ही कामे सांगायची आम्ही ती करून देणार. माणगांवमध्ये आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली असून काही सुरू आहेत. भविष्यात ही विकासकामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आता सर्व हेवेदावे विसरून खा. तटकरेना केंद्रात मंत्री बनवायचं आहे. ७ मे ला घडयाळ समोरील बटन दाबून खा. तटकरेना दिल्लीत पाठवा. यावेळी शिवसेना नेते ॲड. राजीव साबळे, राष्ट्रवादीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष आनंद यादव, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, युवानेते सिद्धांत देसाई आदींनीही मार्गदर्शन केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!