वैभव कळस
म्हसळा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) महिला तालुका अध्यक्ष रश्मी तांबे यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के, जिल्हा महिला संघटिका स्वीटी गिरासे, तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, नगरसेविका राखी करंबे, बाळा म्हात्रे, राजाराम तिलटकर, सुजित येल्वे, अतिक उकये, रीमा महामुनकर, शहरप्रमुख विशाल सायकर, अजय करंबे, मुबशीर हुर्जुक, राजेंद्र मोहिते, पांडुरंग बने आणी शिवसैनिक उपस्थित होते.
रायगड लोकसभेचे शिवसेना उमेदवार अनंत गीते यांना विजयी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे रश्मी तांबे यांनी यावेळी सांगितले. रश्मी तांबे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने तालुक्यातील महिला संघटन मजबूत झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नक्कीच त्याचा फायदा होणार असल्याचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी बोलताना सांगितले.
