• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

संकटकाळी न फिरणारे आज निवडणुकीमध्ये भावनिक राजकारण करत आहेत; सुनील तटकरे यांचे अनंत गीते यांच्यावर टीकास्त्र

ByEditor

Apr 20, 2024

“बॅ. अंतुले यांना हिरवा साप म्हणून संबोधणारे गीते यांना स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार नाही”

बोर्ली पंचतन विभागात सुनील तटकरे यांच्या प्रचारसभेचा झंझावात

बोर्ली पंचतन शिवसेना (उबाठा) चे शोएब पांगारकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
जनतेवर जेव्हा संकट आले तेव्हा मदतीसाठी व विकासासाठी कधीही न फिरणारे अनंत गीते हे निवडणुक आली की भावनिक राजकारण करायच काम करतात. अनंत गीतेंनी 30 वर्षाच्या कारकिर्दीत जेवढी विकासकामं केली नसतील त्याच्या 10 पट काम आदर्श सांसद गावात आम्ही 5 वर्षात केले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी सांगितले. बोर्ली पंचतन विभागांतील वडवली येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

32 रायगड लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची सभेचे आयोजन बोर्ली पंचतन विभागातील दिघी, दिवेआगर, भरडखोल, बोर्ली पंचतन, वडवली येथे करण्यात आले होते. यावेळी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष महमद मेमन, जिल्हा मुख्य प्रवक्ता शामकांत भोकरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, मंदार तोडणकर, मुख्य संघटक नंदू पाटील, ऋषिकेश गोळे, बोर्ली पंचतन सरपंच ज्योती परकर, वडवली सरपंच प्रियांका नाक्ती, उपसरपंच सुरेश धुमाळ, दिवेआगर माजी सरपंच उदय बापट, बोर्ली पंचतन माजी सरपंच गणेश पाटील, ज्योत्स्ना हेदुकर, माजी सभापती स्वाती पाटील, तालुका उपाध्यक्ष सुचिन किर, बोर्ली पंचतन शहराध्यक्ष संतोष गायकर, वडवली भंडारी समाज अध्यक्ष सदानंद खेऊर, बबन सुर्वे, चंद्रकांत बिऱ्हाडी, आजीम जंजिरकर, चिंचबादेवी देवस्थान समिती अध्यक्ष सुजित पाटील, विजय पांडव, संतोष भायदे, इतर बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या तडाखेबंद भाषणामध्ये सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्यावर जोरदार टीका करताना म्हणाले की, अनंत गीते 6 वेळा खासदार झाले, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री झाले. त्यांनी मनावर घेतले असते तर कोणत्याही कंपन्यांचे सीएसआर फंड घेऊन अनेक प्रकारची विकासकामे करता आली असती परंतु, यांना फक्त भावनेचे राजकारण करण्याचे काम करता येते. निसर्ग चक्रीवादळ, कोरोना महामारी, महाडमधील महापूर, जनतेवर संकट आली असताना हे गीते कुठे होते असा सवाल त्यांनी केला. तसेच 2009 च्या निवडणुकीमध्ये बॅ. ए. आर. अंतुले यांना हिरवा साप म्हणून टीका करणारे अनंत गीते यांना स्वतःला धर्म निरपेक्ष म्हणण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे तटकरे म्हणाले.

यावेळी बोर्ली पंचतन येथील शिवसेना उबाठा गटाचे मुस्लिम समाजाचे युवासैनिक शोएब पांगारकर यांनी शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

By Editor

14 thoughts on “संकटकाळी न फिरणारे आज निवडणुकीमध्ये भावनिक राजकारण करत आहेत; सुनील तटकरे यांचे अनंत गीते यांच्यावर टीकास्त्र”
  1. I’m really enjoying the design and layout of your blog.
    It’s a very easy on the eyes which makes it much more pleasant for me to come here and visit more often. Did you hire
    out a designer to create your theme? Excellent work!

  2. Hi there! This post couldn’t be written any better!
    Looking through this post reminds me of my previous roommate!

    He continually kept talking about this. I most certainly will
    forward this post to him. Pretty sure he’s
    going to have a great read. Thanks for sharing!

  3. Sweet blog! I found it while searching on Yahoo News.

    Do you have any suggestions on how to get listed in Yahoo News?

    I’ve been trying for a while but I never seem to get there!
    Thank you

  4. Thank you for the good writeup. It in fact was a amusement account
    it. Look advanced to more added agreeable from you! By the way, how can we
    communicate?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!