शशिकांत मोरे
धाटाव : सद्गुरु कृपा फार्म बारशेत, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टर( नेरुळ ) यांच्या संयुक्त विद्यमाने बारशेत येथे गुरुवारी ( ता. १८ ) रोजी आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले.
या शिबिरात २०० पेक्षा जास्त रुग्णांनी सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला. तज्ञ डॉक्टरांच्या टीमने रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली. ज्यामध्ये रक्तदाब, शुगर, नेत्र तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला समाविष्ट होता. गरजू रुग्णांना मोफत औषधे आणि चष्मे देखील वाटण्यात आले. शिबिरादरम्यान हृदयाची अँजिओप्लास्टी, हाडांची शस्त्रक्रिया, किडनीशी संबंधित आजारांवर उपचार तसेच इतर अनेक शस्त्रक्रिया तेरणा हॉस्पिटल, नेरुळमधील डॉ. अजित निळे, डॉ. अधिक लोखंडे आदी अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत.
शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना यांच्या सहकार्यमुळे हे शिबीर यशस्वी झाले.
-सुबोध सिनकर
प्रमुख सल्लागार, तेरणा हॉस्पिटल
