• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे पोलिसांची धडक कारवाई, दोन गावठी दारूच्या भट्ट्या केल्या उध्वस्त

ByEditor

May 19, 2023

किरण लाड
नागोठणे :
नागोठणे पोलिस स्टेशन हद्दीतील कालकाई, चेराठी भागातील जंगल परिसरात धाड टाकुन नागोठणे पोलिसांनी दोन हातभट्ट्या उध्वस्त करीत हजारो रुपये किंमतीची गावठी दारु नष्ट केली आहे.

नागोठणे पोलीस स्टेशन हद्दीतील कालकाई आणि चेराठी येथे गावठी दारू बनविणारे अड्डे असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल पाटील, पोलीस नाईक ढूमने, पोलीस हवालदार ठाकूर, पाटील, पिंगळे यांच्या पथकाने गावठी दारू बनविणाऱ्या भट्ट्यांवर अचानक छापा टाकला. या धाडीत मनाई असलेल्या गावठी दारुच्या दोन हातभट्टी पोलिसांनी उध्वस्त केल्या. धाडीमध्ये 200 लिटरच्या दोन टाक्या, 50 लिटरचे दोन प्लॅस्टिक ड्रम, 20 लिटरचे दोन प्लॅस्टिक ड्रम यांमध्ये गुळमिश्रित मनाई असलेली हजारो रुपये किंमतीची गावठी दारु आढळुन आली.

या धडक कारवाईमध्ये हजारो किंमतीची जप्त केलेली गावठी दारुचे‌ उपकरणे वाहतुकीस अडचणीचे ठरण्याची शक्यता निर्माण झाल्याने सदरहु मुद्देमाल हा जागीच पेटवुन नष्ट करण्यात आला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!