• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे शहरात शनिजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

ByEditor

May 18, 2023

किरण लाड
नागोठणे :
शहरात सालाबादप्रमाणे शनिजयंती उत्सवाचे आयोजन वैशाख वद्य अमावस्या शुक्रवार, दि. १९ मे २०२३ रोजी श्री जोगेश्वरी माता मंदिराच्या प्रांगणात केले आहे.

दरवर्षी नागोठणे शहरात श्री जोगेश्वरी माता मंदिर परिसरात शनिदेवाची जयंती मोठ्या भक्तीभावात, उत्साहात भक्तांच्या उपस्थित साजरी केली जाते. यावर्षीही शुक्रवार, दि. १९ मे रोजी संध्याकाळी ६.३० वाजता शनिदेवांची विधिवत स्थापना होईल. तदनंतर ७ वाजल्यापासून सर्व भक्तांना शनिदेवाचे दर्शन घेण्याचा सोहळा साजरा होईल. याप्रसंगी आलेल्या सर्व भक्तांसाठी, ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ वाजता शनिदेव महाराजांची महाआरती सर्व भक्तांच्या उपस्थित होईल. महाआरतीने उत्सवाची सांगता होईल. अशाप्रकारे या सोहळ्याचे भव्य आयोजन श्री शनि सेवा समिती नागोठणे यांनी केलेले आहे.

या सोहळ्याचा लाभ सर्व भक्तांनी, ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन श्री शनि सेवा समितीचे सेवक दिनेश परमार व सेवा समिती सदस्य यांनी केलेले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!