• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नवीन शेवा उरण येथे शंभरहून अधिक निरंकारी भक्तांचे रक्तदान

ByEditor

Apr 22, 2024

विठ्ठल ममताबादे
उरण :
रक्तदान शिबिरांची श्रृंखला कायम ठेवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने रविवार, दि. २१ एप्रिल २०२४ रोजी नवीन शेवा, उरण येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सुमारे १०० निरंकारी भक्तांनी मानवतेच्या भावनेतून मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. संत निरंकारी रक्तपेढी, विले पार्ले मार्फत रक्त संकलन करण्यात आले.

निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य शिकवणूकीमुळे निरंकारी भक्तगणांमध्ये मानव सेवेची भावना दृढ झालेली असून ते रक्तदाना व्यतिरिक्त इतर अनेक सामाजिक सेवांमध्ये निरंतर आपले योगदान देत आहेत. या शिबिरात देखील सुमारे १५० भक्तांनी रक्तदानासाठी आपली नावे नोंदवली होती. यावरुन सद्गुरु माताजींच्या शिकवणूकीचा प्रभाव दिसून येतो. संत निरंकारी मंडळाचे क्षेत्रीय संचालक अशोक केरेकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक दत्ताराम पाटील तसेच सेक्टरमधील सर्व ब्राँचचे मुखी, सेवादल, संचालक व अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई उरण विभागातून मनोहरशेठ भोईर (शिवसेना, जिल्हाप्रमुख, रायगड) तसेच सोनल निलेश घरत (सरपंच, नवीन शेवा) आदि मान्यवर व्यक्तींनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली. संत निरंकारी मंडळाचे उरण सिटी ब्राँचचे मुखी समीर सहदेव पाटील यांनी स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांच्या सहकार्याने या शिबिराचे यशस्वी आयोजन केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!