• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पत्रकार अनंत नारंगीकर यांच्या कन्येचा विवाह सोहळा संपन्न

ByEditor

Apr 22, 2024

वार्ताहर
उरण :
श्री महागणपती देवस्थान व हुतात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावातील अनंत शंकर नारंगीकर यांची कन्या चि.सौ.का. मानसी हिचा विवाह सोहळा चिरनेर गावातील विद्याधर पाटील यांच्या कुटुंबात जन्मलेल्या चि. विवेक याच्या बरोबर शनिवारी (दि. २०) थाटामाटात पार पडला. या लग्न सोहळ्याची सांगता नारंगीकर-खारपाटील कुलदैवताच्या जागर गोंधळानी रविवारी (दि. २१) चिरनेर गावातील प्रसिद्ध गोंधळी चंद्रकांत बैकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी नातेवाईक मित्र मंडळींच्या उपस्थितीत केली.

यावेळी आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, नवीमुंबई परिसरातील यशस्वी उद्योजक जे. एम. म्हात्रे, पी. पी. खारपाटील, राजाशेठ खारपाटील, क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नामदेवशेठ फडके, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, साई देवस्थानचे अध्यक्ष रवीशेठ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला सदस्या भावनाताई घाणेकर, ठाणे शहरातील यशस्वी उद्योजक अनिल मुंबईकर, उद्योजक नरेश गौरी, समिर शेठ मढवी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, मनसेचे उरण तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कामगार नेते संतोष घरत, तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दत्तात्रेय पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष रवि भोईर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस विकास नाईक, ठाणे म. पा. नगरसेविका अनिता सुनील गौरी, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, जेएनपीटी बंदराचे विश्वस्त दिनेश पाटील, भुषण पाटील, रवि पाटील, उद्योजक मिलिंद ठाकूर, तालुका संपर्क प्रमुख दिपक भोईर, शेकापच्या महिला अध्यक्षा सीमाताई घरत, माजी सभापती नरेश घरत, नितीन कोळी, सेवा शिक्षक नेते दा. चा. कडू गुरुजी, वादळवाराचे संपादक विजय कडू, सरपंच बळीराम ठाकूर, सरपंच संतोष घरत, उप सभापती शुभांगी सुरेश पाटील, सरपंच भास्कर मोकल, सरपंच किर्ती निधी ठाकूर, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते दिनेश तांडेल, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर, भाजपचे युवा नेतृत्व तथा माजी सरपंच महेश कडू, दिपक मढवी, राजेश पाटील, कस्टम अधिकारी महेंद्र भोईर, माजी नगरसेविका कल्पनाताई ठाकूर, उद्योजक पी. डी. जोशी, दौलतशेठ घरत, शिक्षक नेते निर्भय म्हात्रे, बबन पाटील, नरेश मोकाशी, जेष्ठ पत्रकार धनंजय गोंधळी, मधुकर ठाकूर, घनश्याम कडू, सामाजिक नेते सुधाकर पाटील, ॲड. प्रसाद पाटील, ॲड. हृदयनाथ म्हात्रे, ॲड. निशा गौरी, ॲड. निनाद नाईक, सामाजिक नेते संदिप पाटील, पंडितशेठ घरत, विजय भोईर, कुंदाताई वैजनाथ ठाकूर, डॉ. मनिष पाटील, डॉ. प्रकाश मेहता, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, चेअरमन प्रदिप नाखवा,जे. डी. जोशी, आजी माजी सरपंच, उपसरपंच, विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह नातेवाईक मित्र मंडळी यांनी नव वधू वरास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विवेक केली यांनी आँर्केस्ट्राच्या माध्यमातून आपल्या मधूर आवाजाने उपस्थितांची मने जिंकली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!