• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बामणसुरे येथील आदिवासी वाडीवरील महिलांना मासिक पाळी विषयी मार्गदर्शन

ByEditor

Apr 23, 2024

अब्दुल सोगावकर
सोगाव-अलिबाग :
वुमनएज फाऊंडेशन, मुंबई यांच्यातर्फे मंगळवार, दि. २३ एप्रिल २०२४ रोजी चोंढी-बामणसुरे येथील आदिवासी वाडीवरील महिलांना मासिकपाळीच्या दरम्यान घ्यावयाची काळजी व सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर कसा करावा व वापरानंतर व्हिलेवाट कशा प्रकारे लावावी, तसेच पाळी विषयी महिलांमध्ये असलेले समज-गैरसमज व आदिवासी महिलांना मासिक पाळीच्यावेळी सॅनिटरी नॅपकिन्सचा उपयोग करून आपले शारीरिक आरोग्य जपण्यासाठी मार्गदर्शन व जनजागृती करत मोठ्या प्रमाणात सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंढी यांच्या सहकार्याने तसेच वुमनएज फाउंडेशन, मुंबईच्या संस्थापिका आरती परशुरामपुरीया यांच्यातर्फे करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्या जागृती झेरंडे, कल्पिता आमले, चोंढी-बामणसुरे पोलीस पाटील प्रिती गायकवाड, प्रदीप पाटील, नदीम आत्तार व बामणसुरे आदिवासी वाडीवरील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!