• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिघोडे गावात शिरले चोर

ByEditor

Apr 27, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
पोलीस यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कामाला लागली आहे. त्याचा फायदा उठवत अज्ञात चोरांनी दिघोडे गावात शुक्रवारी (दि. २६) रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत शिरकाव केला आहे. मात्र, रहिवाशांच्या सावधगिरीमुळे चोरांना पळता भुई थोडी झाली आहे.

उरण तालुक्यात या अगोदर जासई, धुतूम, चिरनेर, कळंबुसरेसह इतर गावात चोरांनी हैदोस घातला होता. त्यामुळे रहिवाशी भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसत होते. रहिवाशांनी पोलीस यंत्रणेवर संशय व्यक्त केला असताना उरण पोलीसांना काही चोरांना बेड्या ठोकण्यात यश आले. सध्या लोकसभा निवडणुकी बरोबर लग्न सोहळ्याची धामधूम सुरू असल्याचा फायदा उठवत शुक्रवारी (दि, २६) रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत अज्ञात चोरांनी दिघोडे गावात शिरकाव केल्याची घटना घडली. मात्र, रहिवाशांच्या सावधगिरीमुळे चोरांना पळता भुई थोडी झाली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!