• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात लोकनेते दि. बा. पाटलांच्या फोटोचे अनावरण

ByEditor

May 3, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समिर वाठारकर यांनी आपल्या दालनात प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या फोटोचे अनावरण केले. जे या अगोदरच्या गटविकास अधिकाऱ्यांना जमलं नाही ते उरण पंचायत समितीचे सध्याचे गटविकास अधिकारी समिर वाठारकर यांनी करुन दाखवल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

माजी खासदार, लोकनेते दि. बा. पाटील यांनी आपल्या जीवनात स्वतःचे हित न जपता राज्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सातत्याने एक लोकसेवक म्हणून शासनस्तरावर प्रयत्न केले. तसेच उरण, पनवेल, नवीमुंबई परिसरातील प्रकल्पग्रस्तांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. अशा लोकनेत्याचा आदर्श तालुक्यातील लोकसेवक, शासकीय अधिकारी, युवा पिढीसमोर प्रेरणादायी असावा या भावनेतून उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समिर वाठारकर यांनी आपल्या दालनात प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचा भलामोठा फोटो लावण्याचे काम केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!