विनायक पाटील
पेण : 32 रायगड लोकसभेच्या मतदानाचे दिवस जसे जवळ येत आहेत तसा प्रचाराचा जोर वाढत आहे. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा रायगडमध्ये झंजावात सुरू असून कार्यकर्ते पूर्ण ताकदीने प्रचारात उतरलेले दिसत आहेत. पेण शहरातील रामवाडी येथे काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महायुतीचे उमेदवार सुनीलजी तटकरे 100 टक्के निवडून येणार असून रामवाडीमधून आम्ही मोठे मताधिक्य देणार असल्याचे प्रचार रॅलीमध्ये बोलताना हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती भास्कर पाटील यांनी सांगितले. यावेळी हॅट्रिक नगरसेवक निवृत्ती पाटील, नगरसेविका वसुधा पाटील, शहरप्रमुख जितेंद्र ठाकूर, तुकाराम पाटील, कैलास जाधव, आनंद जाधव, शेखर पाटील, लीना म्हात्रे, चंदन पाटील, मनोज पाटील, विलास कोळी, मोसिन मोगल आदींसह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या. या प्रचार रॅलीची सुरुवात सकाळी नऊ वाजता आर. पी. नगर येथील लक्ष्मीनारायण मंदिरात श्रीफळ वाहून करण्यात आली. यावेळी आर. पी. नगर, एसटी कॉलनी, शिवाजीनगर, रेल्वे कॉलनी, सुतारवाडी, समर्थ नगर, बजरंग नगर, रामवाडी या भागातील घरोघरी प्रचार करण्यात आला.