• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबाग खारेपाट विभागात महाविकास आघाडी लीड घेणार -ॲड. प्रथमेश पाटील

ByEditor

May 5, 2024

प्रतिनिधी
अलिबाग :
तालुक्यातील खारेपाट विभागात इंडिया महाविकास आघाडी प्रचंड मतांचे लीड घेऊन अनंत गीतेंना लोकसभेत पाठवणार असल्याचं मत रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे मा. अध्यक्ष, युवा नेते ॲड. प्रथमेश पाटील यांनी प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले.

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तटकरे साहेबांचे निष्ठेने काम करून त्यांना आघाडीचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेला पाठवले होते. परंतु, त्यांनी पुरोगामी विचारांची साथ सोडून जातीयवादी पक्षाबरोबर जाणे पसंत केलं. ज्या पुरोगामी विचारांच्या लोकांनी त्यांना मेहनत घेऊन लोकसभेला पाठवलं त्यांना तटकरे साहेबांनी फसवलं आहे. येणाऱ्या ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील जनता ह्याचा बदला घेतल्याशिवाय रहाणार नाही. वेळोवेळी निवडणुकीत फक्त काँग्रेसच्या मतांचा फायदा घ्यायचा आणि निवडणूक झाली की त्यांना विसरायचं ह्याची चीड युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. राष्ट्रवादी आणि तटकरे साहेबांनी जिल्ह्यात कायम काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचं काम केले. अलिबाग खारेपाट विभागात काँग्रेसच्या विरोधात उमेदवार देऊन काँग्रेसचे उमेदवारांना अडचणीत आणले, परिणामी काँग्रेसच्या बऱ्याच उमेदवारांचा ग्रामपंचायतीमध्ये पराभव झाला. आता काँग्रेस कार्यकर्त्यांना सुवर्ण संधी आहे तटकरेंना पाडायची. हि संधी काँग्रेसचा कार्यकर्ता सोडणार नाही. खारेपाट विभागात इंडिया महाविकास आघाडीला काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता मेहनत घेऊन प्रचंड मतांचे लीड देऊन अनंत गीतेंना लोकसभेत पाठवणार असल्याचा निर्धार ॲड. प्रथमेश पाटील यांनी व्यक्त केला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!