अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीत चोंढी येथे शनिवार, दि. ४ मे रोजी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चोंढी येथील हनुमान मंदिरात ज्येष्ठ समाजसेवक सुधीर गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भव्य प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रचार साहित्याद्वारे घरोघरी जाऊन घड्याळ निशाणीसमोरील बटण दाबून सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा प्रचंड बहूमतांनी विजयी करण्यासाठी मतदारांना आवाहन केले. या प्रचार रॅलीमध्ये चोंढी येथील ज्येष्ठ समाजसेवक सुधीर गायकवाड, प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, नितीश आमले, ओमकार आमले, प्रतीक म्हात्रे, सुदेश सावंत, रुपेश लाड, प्रसन्न कातुर्डे, नदीम अत्तार, प्रदीप पाटील, चेतन जैन, महेश नाईक, अजय नाईक, भरत कातुर्डे, प्रमेय करमेळे, राजेंद्र चव्हाण, रोहन कातुर्डे तसेच पिंट्या गायकवाड मित्रमंडळाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), भाजप व इतर मित्रपक्षांचे महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३२ रायगड लोकसभा मतदारसंघात खासदारकीसाठी उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केल्यानंतर जिल्ह्यातील वातावरण पार ढवळून निघाले असल्याचे दिसत आहे. एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत उमेदवार प्रचारार्थ सभा, कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त झाले आहेत.