विनायक पाटील
पेण : रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या पत्नी, माजी जि. प. सदस्या ज्योती जांभळे (४९) यांचे निधन झाले आहे.
शांत व प्रेमळ स्वभावाच्या ज्योती जांभळे घरी आलेल्या प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करून पाहुणचार करीत असत. जिल्हा परिषद सदस्य असतानाही अगदी साध्या राहणीमानामुळे त्यांनी जनतेच्या मनात घर केले होते. कठीण प्रसंगात संजय जांभळे यांच्यापाठिशी खंबीरपणे उभ्या राहून त्यांनी संजय जांभळे यांचे मनोबल वेळोवेळी वाढविले होते. त्यांच्यावर डोलवी येथील स्मशानभूमीत सायं. 5.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.