मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान झालं. महाराष्ट्रातील 11 तर संपूर्ण देशभरातील 93 मतदारसंघात या टप्प्यात मतदान झालं. राज्यातील रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात मंगळवारी (7 मे) रोजी मतदान झालं. निवडणूक आयोगानं संध्याकाळी 7 पर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 53.95 टक्के मतदान झालं आहे.
93 जागांवरील 1351 उमेदवारांचं भवितव्य EVM मध्ये बंद झालंय. यामध्ये 120 महिलांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (गांधीनगर), ज्योतिरादित्य सिंदिया (गुना), मनसुख मांडविया (पोरबंदर), पुरुषोत्तम रुपाला (राजकोट), प्रल्हाद जोशी (धारवाड) या केंद्रीय मंत्र्यांचं भवितव्य बंद झालं आहे.
तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात झालेलं मतदान
लातूर – 55.38 %
सांगली – 52.56 %
बारामती – 47.84 %
हातकणंगले – 62.18 %
कोल्हापूर – 63.71 %
माढा – 50 %
उस्मानाबाद (धाराशिव) – 55.98 %
रायगड – 50.31 %
रत्नागिरी -सिंधुदुर्ग – 53.75 %
सातारा – 54.11 %
सोलापूर – 49.17 %