• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

32 रायगड लोकसभा मतदारसंघात 60.51  टक्के मतदान; पहा कोणत्या मतदार संघात कीती मतदान?

ByEditor

May 8, 2024

प्रतिनिधी
रायगड :
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 32 रायगड लोकसभा मतदारसंघात दि. 7 मे रोजी 2024  रोजी सकाळी सात ते सायंकाळी  मतदान संपेपर्यंत एकूण 10 लाख 9 हजार 567  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला  असून एकूण 60.51 टक्के मतदान झाले आहे, यामध्ये पुरुष मतदार 5 लाख 334 तर महिला मतदार 5 लाख 9 हजार 233 असल्याची मााहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

32 रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण 16 लाख 68 हजार 372 मतदार असून 8 लाख 47 हजार 763 महिला तर 8 लाख 20 हजार 605 पुरष आणि 4 तृतीयपंथीय मतदार आहेत.

विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे आहे,

191- पेण विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 3 लाख 3 हजार 308 इतके मतदार असून 1 लाख 95 हजार 653 मतदारांनी मतदान केले असून यामध्ये 1 लाख 2 हजार 255 पुरुष तर 93 हजार 398 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

192– अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 97 हजार 396 मतदार असून त्यापैकी 1 लाख 98 हजार 289 मतदारांनी मतदान केले असून  यामध्ये 1 लाख 629 पुरुष तर 97 हजार 660 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

193– श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 62 हजार 266 मतदार असून त्यापैकी 1 लाख 55 हजार 254 मतदारांनी मतदान केले असून  यामध्ये 75 हजार 968 पुरुष तर 79 हजार 286 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

194– महाड विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 84 हजार 386 मतदार असून त्यापैकी 1 लाख 63 हजार 696 मतदारांनी मतदान केले असून  यामध्ये 83 हजार 416 पुरुष तर 80 हजार 280 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

263– दापोली विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 80 हजार 261 मतदार असून त्यापैकी 1 लाख 60 हजार 798 मतदारांनी मतदान केले असून  यामध्ये 75 हजार 810 पुरुष तर 84 हजार 988 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

264– गुहागर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 40 हजार 755 मतदार असून त्यापैकी 1 लाख 35 हजार 877 मतदारांनी मतदान केले असून  यामध्ये 62 हजार 256 पुरुष तर 73 हजार 621 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

32 रायगड लोकसभा मतदारसंघात कुठलाही अनूचित प्रकार न घडता शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारसंघातील सर्व मतदार आणि मतदान प्रक्रियेतील सर्व, अधिकारी कर्मचारी यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आभार मानले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!