खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ८ जण जखणी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटाजवळ शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर आठ जण जखमी झाले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेलमुळे नियंत्रण सुटल्याने दोन वाहने, एक कार आणि कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोला धडक बसून हा अपघात झाला. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra: 3 died, 8 injured on Mumbai-Pune expressway near Bhor Ghat this morning. Accident occurred after a truck going on Mumbai-Pune expressway lost control due to brake failure and hit two vehicles. Injured have been rushed to hospital in Khopoli for treatment. Details… pic.twitter.com/YlwXkFmh0i
— ANI (@ANI) May 10, 2024