• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावजवळ पिकअप–दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वार जखमी

ByEditor

May 11, 2024

सलीम शेख
माणगाव :
माणगावपासून ९ किमी अंतरावर असणाऱ्या इंदापूर गावाच्या हद्दीत मुंबई–गोवा महामार्गावर बोलेरो पिकअप व दुचाकीत समोरासमोर धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी होवून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सदरील अपघात शनिवार, दि. ११ मे २०२४ रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद विराज रामभाऊ गुरव (रा. वाघोटन, जि. सिंधुदुर्ग) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, या अपघाताची फिर्याद देणारे विराज रामभाऊ गुरव हे त्यांच्या ताब्यातील बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ०७ एजे २५७५ ही गाडी गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे माणगाव मार्गे चालवीत घेऊन जात असताना त्यांची गाडी इंदापूर गावच्या हद्दीत आल्यावर समोरून मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे येणाऱ्या बुलेट मोटारसायकल क्रमांक एमएच ०३ सीजे ६९६९ या गाडीची समोरासमोर धडक लागल्याने अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार सचिन विजय बद्रिके (वय ३५ राहणार भांडूप मुंबई) हा जखमी होवून दोन्ही वाहनाचे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात मोटर अपघात रजि नं. १३/२०२४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दोडकुलकर हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!