• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अ‍ॅड. प्रवीण ठाकूर हे कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्यास इच्छुक

ByEditor

May 12, 2024

घनःश्याम कडू
उरण :
मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांत 10 जूनला निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रवीण ठाकूर हे इच्छुक आहेत. त्या संदर्भातले निवेदन अ‍ॅड. ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवले आहे.

विधान परिषदेचे चार सदस्य हे 7 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या चारही मतदारसंघांत 10 जून रोजी मतदान होणार असून, 13 जूनला मतमोजणी होईल. असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या चारही मतदारसंघांमध्ये 15 ते 22 मे या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. निवृत्त होणार्‍या चार सदस्यांमध्ये भाजप, ठाकरे गट, लोकभारती (जनता दल युनायटेड) आणि अपक्ष सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक आपण लढविण्यास इच्छुक आहोत असे म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही उमेदवारी काँग्रेस पक्षाला मिळावी जेणेकरून काँग्रेसमध्ये उर्जितावस्था येईल.

अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी ही निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविताना आपला असलेला जनसंपर्क, वकिली व्यवसायात 30 वर्षाहून अधिक काळ सक्रीयता , शिवाय वडील स्व. मधुकर ठाकूर हे काँगेसचे येथील आमदार होते हे देखील नमुद केले आहे. नुकत्याच झालेल्या रायगड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारात पूर्णपणे सक्रिय राहिल्याचेही नमूद केले आहे. त्यामुळे आपल्या निवेदनाची दखल घेऊन कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला मिळावी अशी मागणी वजा विनंती अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!