• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रितम म्हात्रे यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन घेतले शुभाशीर्वाद

ByEditor

May 15, 2024

विनायक पाटील
पेण :
महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्री सदस्य परिवाराच्या माध्यमातून महाराष्ट्रातीलच नाहीतर संपूर्ण भारत आणि विदेशात सुद्धा अध्यात्माची ओळख नवीन पिढीला करून दिली आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पावलावर पाऊल ठेवून वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, मोफत वैद्यकीय शिबिरे, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहीम, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती केंद्रे आदी उपक्रम राबवण्यात आप्पासाहेबांचे मोलाचे योगदान आहे. तरुण पिढीला योग्य ते विचार देऊन त्यांना आयुष्याची योग्य दिशा देण्यासाठी संपूर्ण धर्माधिकारी कुटुंबियांचा मोठा वाटा आहे.

आज आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी अलिबाग येथे त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन आप्पासाहेबांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. याप्रसंगी त्यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!