अनंत नारंगीकर
उरण : भेंडखळ-पागोटे कोस्टल रोडवर बुधवारी (दि. १५) सकाळी लहान मुलाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. सदर घटनेची माहिती उरण पोलीसांना मिळताच उरण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचे पंचनामे सुरू केले आहेत. सदर मृतदेह साधारण १० वर्षाच्या लहान मुलाचा असल्याचे तपासात पुढे येत आहे. या घटनेसंदर्भात उरण पोलीसांनी संशयी इसमाला ताब्यात घेतल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.