• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण रेल्वेस्थानकाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; चारजण जखमी

ByEditor

May 15, 2024

घन:श्याम कडू
उरण :
आज सकाळी ११ वाजता उरण रेल्वेस्थानकाजवळ एक रिक्षा, चारचाकी गाडी व दोन दुचाकी अशा चार गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आज सकाळी क्रेटा गाडी उरणकडे येत असताना दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करीत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने उरणहून पनवेलकडे जाणाऱ्या रिक्षा व दोन दुचाकीला धडक दिली. रिक्षा चालकाने हुशारीने गाडी बाजूला घेतल्याने वाचत थोडक्यात मार लागला आहे. तर दोन दुचाकीस्वारही जखमी झाले असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एक महिन्यांपूर्वी क्रेटा गाडीने रेल्वे स्थानकाजवळ दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पतीपत्नी ठार झाले तर मुलगी जबर जखमी असून तिच्यावर आजही दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्यानंतर आज या परिसरातच हा दुसरा अपघात घडला. उरण रेल्वे सुरू झाल्यापासून कोटनाका ते बोकडविरा हा मार्ग वर्दळीचा बनला आहे. सर्वच वाहने वेगाने येत असल्याने वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडण्याच्या घटनेत वाढ होत आहे. याची खबरदारी घेऊन वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविणे आवश्यक बनले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!