• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड गटातील महापुरात भिजलेली सेवा पुस्तके नव्याने तयार करण्यास जिल्हा प्रशासनाची तत्त्वता मान्यता

ByEditor

May 24, 2024

शिक्षक परिषदेच्या सततच्या पाठपुराव्याला यश -राजेश सुर्वे

सलीम शेख
माणगाव :
महाड तालुक्यामध्ये दि. 21 व 22 जुलै 2022 रोजी महापूर आला होता. यात महाड शहराचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या महापुरात महाड पंचायत समिती कार्यालय देखील पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. महाड पंचायत समितीमधील शिक्षण विभागातील असणारे सेवा पुस्तके पूर्णपणे पाण्यात भिजून जीर्ण झाली होती. काही सेवा पुस्तकांची पाने भिजून खराब झाली होती.

शिक्षकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची दखल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे व शिष्टमंडळ यांच्यावतीने घेण्यात आली व तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग, शिक्षणाधिकारी (प्रा.) रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांना वेळोवेळी निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेट घेऊन सदरची परीस्थिती प्रशासनाच्या लक्षात आणुन दिली. महाड पंचायत समिती शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकांची सेवा पुस्तके नव्याने भरून घेण्यात यावी व सेवापुस्तकात नोंदी करून, स्वाक्षरी करून मिळावी अशी मागणी वारंवार करण्यात आली होती. सदर मागणीची दखल रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी घेतली असुन महाड पंचायत समिती शिक्षण विभागाला सेवा पुस्तके नव्याने भरणे व नव्याने नोंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर आदेशान्वये शिक्षकांच्या खराब झालेल्या सेवा पुस्तकांची नव्याने नोंद होऊन व स्वाक्षरी होऊन मिळणार आहे सदर आदेश दिल्याबद्दल महाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्यावतीने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, शिक्षणाधिकारी (प्रा.) पुनिता गुरव, महाड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. सुनिता चांदोरकर, सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, शिक्षक परिषदेचे जिल्हा नेते उदय गायकवाड, अलिबाग पतपेढीचे विद्यमान संचालक वैभव पिंगळे यांनी आभार मानले आहेत. सदर आदेशामुळे महाड गटातील शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!