• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

ByEditor

May 25, 2024

बेवारस बॅगेत सापडलेला ३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल केला परत

सलीम शेख
माणगाव :
माणगाव पोलीस नेहमी आपले कर्तव्य चोख बजावीत असताना सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असतात. अशीच एक कौतुकास्पद कामगीरी माणगाव पोलिसांनी केली आहे.

दि. २४ मे रोजी रात्री नाईट राउंड करिता असलेले पो. शि. बोरकर व पो. शि. पवार हे गस्त करीत असताना माणगाव एसटी स्टँडसमोर बेवारस बॅग सापडली. ती बॅग ताब्यात घेऊन माणगाव पोलीस ठाणे येथे येऊन सदर बॅग चेक केली असता बॅगमध्ये पाच तोळ्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळ्याची चैन व रोख रक्कम ५०,००० रुपये असे एकूण ३,७५,००० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बॅगबाबत इसमाचा शोध घेऊन प्रमोद चरण मोहिते, रा. सरवर, म्हसळा हे त्यांच्या मुळ गावी नातेवाईक मयत झाल्याने मुंबई ते माणगाव प्रवास करीत असताना गडबडीत उतरून बॅग विसरून तसेच दुसऱ्या खाजगी गाडीने निघून गेले असे समजले. त्यांना माणगांव पोलीस ठाणे येथे बोलावून सर्व मुद्देमालासहित बॅग त्यांच्या ताब्यात सुस्थितीत देण्यात आली. या कामगिरीबाबत माणगाव पोलिसांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!