• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिवसेना-युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गुजरातमध्ये स्नेहसंमेलन

ByEditor

Jul 3, 2023

हरेश मोरे
साई-माणगाव :
महाड विधानसभेचे तरुण नेतृत्व, युवासेना समन्वयक रोहित पारधे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रा बाहेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासेनेचे पहिले स्नेहसंमेलन गुजरात राज्यात सुरत-नवसारी येथे रविवार २ जुलै रोजी पार पडले.

युवासेना प्रमुख आमदार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने आणि मा. केंद्रीय मंत्री अनंत गीते नेतृत्वाखाली, दक्षिण रायगड संपर्कप्रमुख संजय कदम आणि जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्यावतीने गुजरात-सुरत-नवसारीवासीय ग्रामस्थ मंडळीचे स्नेहसंमेलन आणि भोजनाचा कार्यक्रम नागरदास हॉल, अडाजन-सुरत येथे 300 ते 350 लोकांच्या उपस्थितीत पार पडला. त्या समयी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रोहितदादा पारधे (युवासेना समन्वयक-महाड विधानसभा) आणि इतर मान्यवर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दक्षिण रायगड वासी, विशेष करून महाड विधानसभा मतदार संघामधील नोकरी कामानिमित्त सुरत-नवसारी गुजरातमध्ये वास्तव्यास राहणाऱ्या लोकांशी शिवसेना-युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अत्यंत कौटुंबिक, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांची नाळ अजूनही भगव्याशी म्हणजेच उद्धव ठाकरे सोबत असणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत जोडली गेलेली आहे. या नागरिकांबरोबर असणारे जिव्हाळ्याचे संबंध अधिकाधिक घट्ट व्हावेत आणि विचारांची देवाणघेवाण व्हावी तसेच शिवसेना-युवासेना पक्ष सुरत आणि परिसरात वाढवा, पक्षाला बळ मिळावे या उद्देशाने शिवसेना-युवासेना दक्षिण रायगडच्यावतीने हा स्नेहसंमेलन आणि भोजन कार्यक्रम सकाळी १०.३० ते ३.३० वा वेळेत आयोजित केला होता.

या कार्यक्रमात सहकुटुंब, सह मित्रपरिवार सुरत,नवसारी आणि संपूर्ण गुजरातवासी रायगड-महाड, माणगावकर नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विशेष बाब म्हणजे त्याचं दिवशी सुरत येथे महाडचे शिंदे गटात गेलेलं आमदार भरत गोगावले यांचा सुद्धा मेळावा होता. तरीही त्याचं ठिकाणी युवासेना समन्वयक रोहितदादा पारधे आणि महाराष्ट्र विस्तारक सुधीर ढाणे यांच्या अट्टाहासाने माणगाव महाड युवासेना संपर्क पदाधिकारी रंजित मालोरे, सागर कुंडले, संजय पवार, सुरेश मनवे, मंगेश निगडे तसेच सुरतवासी कार्यकर्ते रामा झोरे, भास्कर झोरे, अनिल शिंदे, रामदास वाडकर, संजय महाडिक, आश्विन सोनार तसेच यावेळी युवासेना समन्वयक द. रायगड दुर्गेश शिंदे, जिल्हा समन्वयक द. रायगड बळीराम घाग, महाड समन्वयक सीताराम मेस्त्री यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!