• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे विभागातील कार्यकर्ते सुनील तटकरेंसोबत ठाम!

ByEditor

Jul 3, 2023

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आदिती तटकरे यांना दिल्या शुभेच्छा

किरण लाड
नागोठणे
: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्या ८ सहकाऱ्यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. या आठ आमदारांमध्ये श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदिती तटकरे यांनी सुद्धा सलग दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आज सकाळपासून आदिती तटकरे यांचे सुतारवाडी निवासस्थानी असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. नागोठणे विभागातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नामदार आदिती तटकरे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आपण खासदार सुनील तटकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून दिले.

यावेळी नागेठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपभाई टके, माजी सरपंच विलास चौलकर, पिगोंडे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच संतोष कोळी, मधुकर चौलकर, सचिन कळसकर, मंगेश तेरडे, माथाडी नेते दिनेश घाग, बिपिन सोष्टे, शामकांत नेरपगार, प्रथमेश काळे, मनोज टके, चेतन टके, ध्रुव सोष्टे, जगदीश दिवेकर, रविंद्र वाजे, रोशन पारंगे, केतन भोय आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!