प्रतिनिधी
नागोठणे : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून यात येथील एस. डी. परमार इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. परमार इंग्लिश मिडीयम स्कूल ज्युनिअर कॉलेज वेलशेतचा सन २०२३-२०२४ इयता १० वीचा निकाल १०० टक्के लागला असून यात प्रथम क्रमांक अनुष्का यशवंत यादव (८९.६०%), द्वितीय क्रमांक संस्कृती बबन नावले (८७.४०%), तृतीय क्रमांक प्रतिभा सुशांत मोहंती (८४.८०%) यांनी पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भा.ए.सो.चे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन, खजिनदार सुरेश जैन व मुख्याध्यापिका अमृता गायकवाड यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.